interesting facts and history of parle g that will make every indian proud
पार्ले-जीबद्दलच्या 'या' गोष्टींचा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 2:43 PM1 / 6पार्ले कंपनीची सर्वात जुनी फॅक्टरी विलेपार्ल्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच ही फॅक्टरी बंद झाली. आता तिथं कंपनीचं मुख्यालय उभारण्यात येणार आहे. पार्ले-जी बिस्कीट बाजारात दाखल होऊन अनेक वर्षे झाली. मात्र त्याचा दर्जा अद्यापही कायम आहे. विशेष म्हणजे पार्ले-जी हे जगातील सर्वाधिक खपाचं बिस्कीट आहे. 2 / 6अनेकांना पार्ले-जी मधील 'जी'चा अर्थ जिनियन वाटतो. मात्र त्याचा खरा अर्थ ग्लुकोज आहे. 1980 पर्यंत पार्ले-जी बिस्कीट पार्ले ग्लुकोज नावानं ओळखलं जायचं. मात्र त्यानंतर लहान मुलं आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी हे नाव बदलून पार्ले-जी असं करण्यात आलं. 3 / 6चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र पार्ले-जीचं वर्षभरातील उत्पादन इतकं जास्त आहे की संपूर्ण चीननं ही बिस्कीटं खाल्ली, तरी भरपूर बिस्कीटं उरतील. गंमत म्हणजे आता हे तुम्ही वाचत होतात, त्यावेळी जगातील 4551 व्यक्ती पार्ले-जी खात होत्या.4 / 6पार्ले-जीचा जन्म भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच झाला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 8 वर्षे म्हणजेच 1939 मध्ये पार्ले-जीचं उत्पादन सुरू झालं होतं. 5 / 6पार्ले-जी 1 बिलियन बिस्कीटांच्या पाकिटांचं उत्पादन करतं. या बिस्कीटांची विक्री देशातील 5 मिलियन दुकानांमध्ये होते. एका दिवसाला पार्ले-जीची 400 मिलियन बिस्कीटं तयार होतात.6 / 6पार्ले-जीचं उत्पादन इतकं प्रचंड आहे की एका महिन्यात तयार झालेली बिस्कीटं रांगेत ठेवली, तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर भरुन निघेल. हे अंतर 7.25 लाख किमी इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications