Lover beaten at girlfriend house in night married in morning rampur
रात्री गर्लफ्रेंडला भेटायला गेला, तिच्या घरच्यांनी चोप चोप चोपला, अन् सकाळी त्यालाच बनवलं जावई By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 12:39 PM2020-11-22T12:39:33+5:302020-11-22T12:58:06+5:30Join usJoin usNext उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एक प्रियकर रात्री आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या तरूणाला एका खोलीत बंद करून ठेवलं आणि खूप मारलं. दुसरा दिवस उगवल्यानंतर या तरूणाला मुलीच्या घरच्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. गुन्हा, कोर्टकचेरी पासून वाचण्यासाठी त्यांनी रात्री ज्या मुलाला मारहाण केली त्यालाच आपला जावई बनवून घेतलं. ही घटना रामपूरच्या अजीमनगर परिसरातील मेहंदीनगर सुमाली गावातील आहे. या ठिकाणी सदर तरूणाची प्रेससी राहते. स्वारमधील गद्दी गावातील रहिवासी प्रेम सिंह या तरूणाचे लक्ष्मी नावाच्या तरूणीशी प्रेमसंबंध होते. रात्री १२ च्या सुमारास प्रेम सिंह आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पोहोचला. जेव्हा तिच्या घरच्यांना आणि गावातील लोकांना ही बाब कळली तेव्हा त्यांनी एका खोलीत बंद करून मारहाण करायला सुरूवात केली. ही घटना पोलिस स्थानकापर्यंत पोहोचली. या घटनेबद्दल अप्पर पोलिस निरिक्षक अरूण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळताच कुटूंबासह या तरूणाला पोलिस स्थानकात बोलावण्यात आले. एकत्र बसून चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुलाकडचे आणि मुलीकडच्या लोकांच्या संमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नंतर आजमगडच्या एका लहान मंदिरात त्यांनी लग्न केले. (Image Credit- trekbible)टॅग्स :जरा हटकेउत्तर प्रदेशलग्नJara hatkeUttar Pradeshmarriage