शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! ड्रायव्हिंग टेस्टमध्ये तब्बल १९२ वेळा नापास; बनवला रेकॉर्ड, गेल्या १७ वर्षांपासून शिकतोय गाडी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:25 AM

1 / 9
पोलंडमधील एक ५० वर्षीय व्यक्ती गेल्या १७ वर्षांपासून ड्रायव्हिंगची थेअरी टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी होत आहे. या व्यक्तीने गेल्या १७ वर्षात १९२ वेळा ही टेस्ट दिली आहे.
2 / 9
या देशातील हा एक विक्रम आहे. गेल्या दोन दशकांपासून प्रयत्नशील असलेल्या या व्यक्तीने आतापर्यंत १ लाखाहून अधिक फी भरली आहे.
3 / 9
पोलंडमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधी थेअरी टेस्ट पास करावी लागते. त्यानंतर प्रॅक्टिकल पेपरदेखील द्यावा लागतो. विशेष म्हणजे, कोणतीही प्रौढ व्यक्ती कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकते.
4 / 9
या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अनेकदा थेअरी रेटसाठी ५० ते ६० टक्के असते, तर प्रॅक्टिकलसाठी ४० टक्के असते. पोलंडमधील लोक अनेकदा दुसर्‍या किंवा तिसर्‍या प्रयत्नात ही टेस्ट पास होतात.
5 / 9
टीव्हीपीच्या अहवालानुसार, यापूर्वी या शहरात एका व्यक्तीने ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्यासाठी ४० वेळा प्रयत्न केला होता. याशिवाय, पोलंडच्या ओपोल शहरात एका व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी ११३ वेळा प्रयत्न केले आहेत.
6 / 9
हे प्रकरण समोर आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण करण्याची अमर्यादित संधी दिली पाहिजे का? यावर प्रशासन विचार करत आहे. पोलंडमध्ये २० किंवा ३० पेक्षा जास्त अशा संधी दिल्या जाऊ नयेत, असे टीव्हीपीशी बोलताना स्टॅनीस्लॉ नावाच्या ड्रायव्हिंग इंस्ट्रक्टरने म्हटले आहे.
7 / 9
'माझ्या मते, कोणत्याही व्यक्तीला इतकी संधी भरपूर आहे की, तो वाहन चालविण्यासाठी पात्र आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी. जर एखाद्या व्यक्तीने वाहन चालविण्याच्या नियमांकडे लक्ष देत नसेल आणि ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होत नसेल तर त्याने रस्त्यावर वाहन चालवू नये. कारण ते इतर लोकांसाठी धोकादायक ठरू शकते', असे स्टॅनीस्लॉ यांनी सांगितले.
8 / 9
याआधी ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी बातमी दिली की, एका ४२ वर्षीय व्यक्तीने १५८ वेळा प्रयत्न करून वाहन चालविण्याशी संबंधित थेअरी टेस्ट पास केली होती. दरम्यान, पोलंडमधील या व्यक्तीला दक्षिण कोरियामधील एका महिलेने कठोर आव्हान उभे केले आहे.
9 / 9
२००९ मध्ये ही महिला चर्चेत आली होती. ज्यावेळी तिने ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी ९५० वेळा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही ही टेस्ट उत्तीर्ण होऊ शकली नाही.
टॅग्स :Automobileवाहन