ही क्विन ऑफ डार्क सध्या इंटरनेटवर घालतेय धुमाकुळ, 'या' कारणासाठी आली आहे चर्चेत... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 05:58 PM 2021-09-21T17:58:04+5:30 2021-09-21T18:31:52+5:30
'क्वीन ऑफ डार्क’ नावाने ओळखली जाणारी न्याकिम गेटवे या सुदानच्या मॉडेलचा सध्या इंटरनेटवर बोलबाला आहे. शरीराचा वर्ण सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या आड येत नसल्याचे तिने सिद्ध केले आहे. दक्षिण सुदानची एक मॉडेल न्याकिम गॅटवेच सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे. या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला क्वीन ऑफ डार्क म्हणून ओळखले जात आहे.
सध्या गोरे बनण्यासाठी विविध क्रिम बाजारात आहेत. अनेकांना गोरे होण्याची क्रेज असते. पण सुदानमध्ये या मॉडेलचा रंग एकदम काळा आहे, पण तिला या रंगाचा गर्व आहे.
मॉडेलिंग क्षेत्रात अतिशय सहजतेने वावरणाऱ्या न्याकिमला वर्णावरून कोणी बोचरी टीका केल्यास हजरजबाबी न्याकिमदेखील त्या व्यक्तीस योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद करते.
२४ वर्षांची न्याकीम ही जन्मतःच काळ्या कुळकुळीत रंगाची. जगात न्याकीम अत्यंत आत्मविश्वासानं वावरते, तेसुद्धा ग्लॅमरच्या जगात.सुदानमधली ती अत्यंत यशस्वी मॉडेल आहे.
न्याकीम इन्स्टाग्रामवर अॅक्टिव आहे. ती ब्लॅक, ब्युटीफुल आणि बोल्डही आहे. तिला सतत तिच्या काळेपणावरुन टोमणे ऐकावे लागतात.
उबेर कॅबमधील प्रवासादरम्यान ड्रायव्हरने न्याकिमला तिच्या वर्णावरून प्रश्न विचारला होता. हा किस्सा कथन करताना ती सांगितले की, मला वाईट वाटणार नाही याची खात्री करून उबेर चालकाने विचारले, जर तुला स्किन ब्लिच करण्यासाठी १० हजार डॉलर्स दिले, तर तू स्किन ब्लिच करशील का? यावर माझे उत्तर नाही असे होते आणि त्याच्या प्रश्नावर मला हसू आले.
कितीही पैसे देऊ केले तरी मी स्वत:च्या त्वचेशी छेडछाड करणार नाही. देवाने बहाल केलेल्या रंगासोबत मी छेडछाड का करावी, असा प्रश्नदेखील तिने ड्रायव्हरकडे उपस्थित केला.
तर तुझा ‘डार्क कलर’ ही देवाची देण आहे असे तुझे मानणे आहे, असे म्हणत न्याकिमच्या उत्तरावर ड्रायव्हरने प्रतिक्रिया नोंदवली.
दिसण्यावरून मी कशा स्वरुपाच्या प्रश्नांना सामोरी गेले आहे याचा अंदाजदेखील तुम्ही बांधू शकणार नाही, असे ती सांगते.
सुदानच्या या मॉडेलला सोशल मीडियावर क्वीन ऑफ डार्क अशी पदवी दिली आहे. तिने या पदवीबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणाली, जगात प्रत्येक माणूस सुंदर असतो, आपला जो स्कीनचा कलर आहे, तो देवाने दिला आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल वाईट का वाटून घ्यावे.