५ वर्ष ज्या ऑफिसमध्ये झाडू मारत होती महिला, आज झाली त्याच ठिकाणी बॉस...

By अमित इंगोले | Published: October 5, 2020 03:57 PM2020-10-05T15:57:31+5:302020-10-05T16:06:00+5:30

नशीब बदलणारी ही घटना रशियातील आहे. इथे ऑफिसमध्ये सफाईचं काम करणाऱ्या एका महिलेला कोणत्याही तयारीविना निवडणुकीत उतरवलं. पण या नशीबवान महिलेने निवडणुक जिंकून इतिहास रचला.

2020 ने लोकांना नशीबावर विश्वास ठेवायला शिकवलंय. यावर्षी अशा अशा गोष्टी घडल्या ज्यांची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. असा कुणी विचारली केला नसेल की, लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेरही येणार नाहीत. नशीबाचा खेळही असाच काहीसा आहे. इथे कधीही काहीही होऊ शकतं. २०२० मध्ये रशियातील एका सामान्य महिलेचं नशीबही बदललं आहे. ही महिला एका ऑफिसमध्ये झाडू मारायचं काम करत होती. पण तिने कधी विचारही केला नसेल की, एक दिवस ती तेथील बॉस होईल. आज ही महिला त्या ऑफिसची बॉस आहे आणि त्या हाताखाली सगळे काम करतात.

नशीब बदलणारी ही घटना रशियातील आहे. इथे ऑफिसमध्ये सफाईचं काम करणाऱ्या एका महिलेला कोणत्याही तयारीविना निवडणुकीत उतरवलं. पण या नशीबवान महिलेने निवडणुक जिंकून इतिहास रचला.

रशियात काही दिवसांपूर्वी काही स्थानिक निवडणूका पार पडल्या. यात पोवालीखिनोमध्येही निवडणूक झाली.

ज्या पदासाठी निवडणूक होणार होती त्यासाठी गावातून केवळ राष्ट्रपती पुतिन यांच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. त्याचं नाव होतं Nikolai Loktev असं होतं.

मरिना आता तिच्या क्षेत्रात काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. तिने काही डेव्हलपमेंट प्लान्सही तयार केले आहेत. ही निवडणूक आणि त्याचा निकाल ऐतिहासिक झाला आहे.

ही महिला प्रशासकीय इमारतीत गेल्या ५ वर्षांपासून झाडू मारण्याचं काम करत होती. महिलेचं नाव आहे Marina Udgodskaya. तिच्यासाठी कुणी प्रचारही केला नाही.

निकोलाईला वाटलं होतं की, महिला निवडणूक हरेल आणि तो त्याच्या पदावर कायम राहील. पण जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर आला तर सगळे हैराण झाले. कारण ती सफाई कामगार महिला जिंकली होती.

३५ वर्षांची मरिनाला ६२ टक्के लोकांनी मतदान केल आणि तिला विजयी केलं. आता तिला १५५ किलोमीटर परिसरात पसरलेल्या पोवालिका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.या विजयाने ती फार आनंदी आहे.

मरिना आता तिच्या क्षेत्रात काम करण्यासाठी फार उत्सुक आहे. तिने काही डेव्हलपमेंट प्लान्सही तयार केले आहेत. ही निवडणूक आणि त्याचा निकाल ऐतिहासिक झाला आहे.