सांवलिया सेठ मंदिरात भक्तांचा रेकॉर्ड, कोरोना काळातही १० दिवसात दान केले इतके कोटी रूपये! By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:57 PM 2021-07-09T14:57:33+5:30 2021-07-09T15:10:17+5:30
श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या. मेवाडच्या प्रसिद्ध कृष्ण धाम चित्तोडगढ जिल्ह्याच्या सांवलिया जी मध्ये कोरोना काळानंतर उघण्यात आलेल्या दान पेटीतून ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम निघाली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे लॉकडाऊननंतर केवळ १० दिवसातच इतकं दान लोकांनी दिलं आहे.
सांवलिया जी मध्ये गेल्या १० एप्रिलला चतुर्दशीवर दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोना संक्रमणामुळे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. नंतर मंदिर २८ जूनला पुन्हा उघडण्यात आलं होतं.
मंदिर उघडण्यात आल्यावर केवळ १० दिवसात दानपेटीतून ३ कोटी १२ लाख रूपयांचं दान निघालं आहे. त्याशिवाय ३३ ग्रॅम सोनं आणि १३७० ग्रॅम चांदीचे दागिनेही आहेत.
श्री सांवलिया जी हे प्रकट देवस्थान मानलं जातं. या मंदिराचा मोठा इतिहास आहे. १८४० साली बाभळीचं झाड कापून तिथे खोदल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या ३ प्रतिमा सापडल्या होत्या.