शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऐकावं ते नवलच! तब्बल 7 कोटींना विकली गेली कारची पार्किंग स्पेस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 10:30 AM

1 / 6
हाँगकाँगला जगातील सर्वात महागडा देश म्हणून ओळखले जाते. येथे राहणे, खाणे आणि पिणेही खूपच महागडे आहे. हाँगकाँगमध्ये महागाई एवढी आहे याचा अंदाज तुम्ही कारच्या पार्किंग स्पेसवरून लावू शकता. एका कारसाठी पार्किंग विकत घ्यायचे असल्यास तेथे तब्बल 1 दशलक्ष डॉलर म्हणजे 7 कोटी रुपये मोजावे लागत आहेत.
2 / 6
कार पार्किंगची किंमत सात कोटी झाली आहे. ही पार्किंग 134 स्केअर फूट एवढी असून एका स्क्वेअर फूटसाठी 5.10 लाख रुपये मोजले आहेत.
3 / 6
रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष ठेवणारी कंपनी नेबरहूड एक्सने ही माहिती दिली आहे. ही पार्किंग स्पेस उद्योगपती जॉनी चेऊंग यांची होती. त्यांचे ऑफिस जवळच्याच इमारतीमध्ये 73 व्या मजल्यावर आहे. हाँगकाँगमध्ये जागेची खूप कमतरता आहे. यामुळे तेथील किंमत चौपटीने वाढली आहे.
4 / 6
ही पहिलीच वेळ नसून गेल्या वर्षीही तेथील एका शहरात कार पार्किंगची जागा पाच कोटींना विकली गेली होती. तेव्हा 150 वर्ग फुटाच्या जागेला 5 कोटी 08 लाख 78 हजार रुपयांना विकली गेली होती. 2017 मध्ये 188 वर्ग फुटाच्या जागेला 4 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. येथील घरांपेक्षा पार्किंगच्या जागेंच्या किंमती जास्त असल्याचे स्थानिक वृत्त पत्राने म्हटले आहे.
5 / 6
भारतात मुंबईमध्ये पार्किंगचे सर्वाधिक दर आहेत. येथे एका स्क्वेअर फुटाची किंमत 1.2 लाख रुपये आहे.
6 / 6
धक्कादायक म्हणजे तिथे डिस्काऊंट ऑन पार्किंग स्पेस अशी जाहिरात करून घरे विकली जातात.