taiwanese artists extra ordinary miniature art
टाकाऊ वस्तूंपासून साकारलेली न्यारी दुनिया By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:00 PM2019-09-30T15:00:38+5:302019-09-30T15:06:05+5:30Join usJoin usNext तैवानमध्ये राहणारा झेंग हाँगझान नावाचा अवलिया लहान वस्तूंमधून विश्व साकारतो. झेंग त्यांच्या मिनिच्युर आर्टमुळे प्रसिद्ध आहे. लहानपणी प्रत्येकाला खेळण्यांची आवड असते. हीच आवड पुढेही कायम ठेवत झेंग यांनी ती एका नव्या उंचीवर नेली. लहान मुलांना नव्या गाड्या आवडतात. तर झेंग यांना जुन्या. इतकाच काय तो फरक आसपासची मोठी दुनिया एका कार्डबोर्डवर साकारण्याची कला झेंग यांना अतिशय उत्तमपणे जमलीय. फक्त गाड्याच नव्हे, इतरही अनेक निरुपयोगी वस्तूंचा झेंग उत्कृष्ट वापर करतात. या भन्नाट कलेनं झेंग यांना मानसन्मानदेखील मिळवून दिले आहेत. हमामात्सूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन मिनिच्युर चॅम्पियनशीप स्पर्धा झेंग यांनी जिंकल्या आहेत.