ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १ : व्हाट्स अॅप आणि फेसबुक हे आपल्या रोजच्या वापरातील अविभाज्य घटक बनले आहेत. फेसबुक आपण न चुकता रोज पाहतो. घरी, ऑफिसमध्ये तर कधी ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला फेसबुक वापरायचा मोह आवरत नाही. २००४ मध्ये लाँच झालेलं फेसबुक सुमारे दशकाहून जास्त काळ आपल्या संवाद साधनांवर अधिराज्य करत आहे. फेसबुकच्या अति वापराचे काही तोटे असले तरी आज आपल्या दैनंदिन वापरात त्याचे महत्त्वाचे स्थान असून फेसबुकची जागा कोणी घेईल असे चित्र नजीकच्या काळात तरी दिसून येत नाही. म्हणूनच आम्ही फेसबुकची नवीन अशी काही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगत आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल आणि जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही 'कानेक्ट' होऊ शकाल. मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाचे बनवा वेळापत्रकतुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल आणि तुमच्या मित्राचा, मैत्रिणीचा किंवा नातेवाईकांपैकी कोणाचा वाढदिवस असेल तर फेसबुकने सूचित/नोटीफाई करून देखील कामाच्या व्यस्ततेत बर्थडे मेसेज त्यांना पाठवायचं राहून जाण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींसाठी फेसबुक मध्ये खास पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही आधीच बर्थडे मेसेजच एक शेड्युल बनवून सेव्ह करू शकता. यासाठी BirthdayFB.com ला तुमचं फेसबुक अकाउंट कनेक्ट करायचं आणि पुढे दिलेल्या सुचना फॉलो करायच्या. त्यानंतर तुम्हाला शुभेच्छा संदेश/बर्थडे मेसेज बनवायचा आणि तो कधी पाठवायचा याचा पर्याय येईल तिथे तुमचा बर्थडे मेसेज टाईप करून सेव्ह करू शकता. यामुळे तुम्हला प्रत्येक वेळी बर्थडे मेसेज टाईप करावा लागणार नाही. बर्थडे नोटीफिकेशन पासून सुटका करा तुम्हाला तुमच्या मित्रांचा नातेवाईकांचा वाढदिवस माहित असेल आणि रोजच्या बर्थडे नोटीफिकेशनने हैराण असाल तर तुम्ही तुमच्या अफेसबूक अकाऊंटच्या सेटिंग्स मध्ये जाऊन बर्थडे नोटीफिकेशन बंद करण्याच्या पर्याय निवडू शकता. फेसबुक आयडी मिळवाफेसबुक आयडी मिळविण्यासाठी findmyfbid.com येथे जाऊन आपल्या फेसबुक अकाउंटचा यूआरएल टाकायचा. तुम्हाला तुमचा फेसबुक आयडी मिळाला की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनी कोणकोणती पेजेसला लाईक केले आहे तसेच इतरही माहिती मिळवू शकता. गेम खेळा फेसबुक मेसेंजरमध्ये चेस/बुद्धिबळ आणि बास्केट बॉल सारख्या गेम्स फेसबुक मेसेंजरमध्ये खेळू शकता,हे तुम्हाला माहीत आहे का ? यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक मेसेंजरचं नवीन अपडेट असणं आवश्यक आहे. गेम खेळण्यासाठी बास्केट बॉल च्या इमोजीवर क्लीक करून विंडो मध्ये त्यावर टॅप करायचं. तर चेस/बुद्धिबळ खेळण्यासाठी तुमच्या फेसबुक मेसेंजरच्या चॅट बॉक्स मध्ये ‘@fbchess play’ हे टाईप करायचं. नेमका कोणी फोन केला आहे हे शोधाआपण फोन बदलतो किंवा कधी फोन मधील कॉन्टॅक्टस निघून जातात (डिलेट) अशावेळी मेसेज आलेल्या किंवा फोन आलेल्या प्रत्येकाला नाव विचारणं पण बरोबर वाटत नाही. अशावेळी फेसबुक मधून तुम्ही फोन नंबरच्या आधारे एखाद्या व्यक्तीला शोधू शकता. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही शोधावायच्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या व्यक्तीने फेसबुकवर आपला फोन नंबर लिहिलेला असावा. नकोशांना ब्लॉक करा फेसबुक चॅट वरूनतुम्हाला ठराविक व्यक्तींशी बोलायचे नसेल पण बाकीच्यांसाठी ओनलाईन राहायचे असेल तर तुम्ही फेसबुक चॅट वरून काहींना ब्लॉक करू शकता. यासाठी चॅट विंडोच्या ऑप्शन मध्ये जाऊन ऍडव्हान्स सेटिंग्स वरती क्लीक करायचं आणि मग तुम्हाला स्क्रीन वर एक विंडो येईल तिथे ज्या व्यक्तीला ब्लॉक करायचे आहे. ज्या व्यक्तीला ब्लॉक करायच तिचे नाव टाईप करून काही कालावधीसाठी ब्लॉक करू शकता. कुठूनही करा फेसबुक मधून लॉग आउटसमजा तुम्ही तुमच्या मित्राकडे गेलात आणि तिथून तुमच्या फेसबुक अकॉउंटला लॉग इन केलं आणि लॉग आउट करायचं विसरलात तर काळजी करायची गरज नाही. तुम्ही इतर ठिकाणाहून देखील फेसबुक अकाउंट लॉग आउट करू शकता. यासाठी तुम्ही फेसबुक अकाउंटमध्ये लॉग इन असताना सेक्युरिटी सेटिंग्स मध्ये जाऊन चालू सेशन्स पाहू शकता आणि तेथून चालू सेशन्स बंद करू शकता.