ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 5 - काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राहटगाव येथे शेतक-यांच्या आंदोलना पाठिंबा देत त्यात सहभागही नोंदवला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूकही रोखून धरली. आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर जाळपोळदेखील केली. यशोमती ठाकूर यांनी शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. जाळपोळ आणि तीव्र आंदोलनामुळे काही काळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कर्जमाफीसहीत विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी राज्यभरात पुकारलेल्या संपला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळ शहरातील व्यापारी प्रतिष्ठाननंही कडकडीत बंद पाळला आहे. शेतक-यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास शासनाकडून होत असेलल्या दिरंगाईला विरोध दर्शवण्यासाठी शेतक-यांनी बसस्थानक चौकात मुंडण करून शासनाचा निषेध केला. तसंच यवतमाळ-घाटंजी मार्गावरील कोळंब फाटा आणि नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील भांबराजा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आल्यानं येथील वाहतूक ठप्प झाली होती.(शेतकरी संप : नाशिकमध्ये फडणवीस सरकारची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा)तर नाशिकमधील वडांगळी येथे आंदोलकर्त्या शेतक-यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर चांदवड येथे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांचा ""महाराष्ट्र बंद"" उर्त्स्फुत प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला आहे. लासलगाव-चांदवड रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं रास्तारोको करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्या सह 5 ते 6 शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. लासलगाव, चांदवड, ठेंगोडा येथील व्यापाऱ्यांनीही दुकाने 100 टक्के बंद ठेऊन संपला पाठिंबा दर्शवला आहे. तर नांदूर शिंगोटे, भोजापूर खोरे, दोडी, दापूर, मानोरी इत्यादी भागांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. (VIDEO : जळगावात काढली मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा)शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांची पूर्तता करण्याबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून संपात सहभागी झालेल्या जळगावातील उंबरखेडमधील शेतक-यांनी सोमवारी (5 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.