Aishwarya Pissay annexes FIM World Cup, becomes first Indian ever to win world title in motorsport
ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:19 PM2019-08-13T12:19:30+5:302019-08-13T12:31:35+5:30Join usJoin usNext भारताच्या 23वर्षीय ऐश्वर्या पिस्सायने मंगळावारी ऐतिहासिक कामगिरी केली. FIM वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. मोटरस्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलाने बाजी मारली आहे. तिनं कनिष्ठ गटातही दुसरे स्थान पटकावले आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत ऐश्वर्याने बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगाल ( तिसरे), स्पेन ( पाचवे) आणि हंगेरी (चौथे) येथे पार पडलेल्या स्पर्धेत साजेशी कामगिरी करताना 65 गुणांची कमाई केली. अवघ्या चार गुणांच्या फरकाने ऐश्वर्याने महिला गटाचे जेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात तिला 46 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हंगेरीच्या टप्प्यात सहभागी होण्यापूर्वी एश्वर्या ( 52) आणि व्हिएरा ( 45) यांच्यात जेतेपदासाठी कडवी टक्कर होती. पण, ऐश्वर्याने चौथे स्थान पटकावताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसऱ्या स्थानासह 16 गुण कमावले. टॅग्स :बाईकbike