Aishwarya Pissay annexes FIM World Cup, becomes first Indian ever to win world title in motorsport
ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी; मोटरस्पोर्टमध्ये वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:19 PM1 / 8भारताच्या 23वर्षीय ऐश्वर्या पिस्सायने मंगळावारी ऐतिहासिक कामगिरी केली.2 / 8FIM वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. 3 / 8मोटरस्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलाने बाजी मारली आहे. तिनं कनिष्ठ गटातही दुसरे स्थान पटकावले आहे. 4 / 8दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत ऐश्वर्याने बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगाल ( तिसरे), स्पेन ( पाचवे) आणि हंगेरी (चौथे) येथे पार पडलेल्या स्पर्धेत साजेशी कामगिरी करताना 65 गुणांची कमाई केली. 5 / 8अवघ्या चार गुणांच्या फरकाने ऐश्वर्याने महिला गटाचे जेतेपद पटकावले. कनिष्ठ गटात तिला 46 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.6 / 8हंगेरीच्या टप्प्यात सहभागी होण्यापूर्वी एश्वर्या ( 52) आणि व्हिएरा ( 45) यांच्यात जेतेपदासाठी कडवी टक्कर होती. 7 / 8पण, ऐश्वर्याने चौथे स्थान पटकावताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसऱ्या स्थानासह 16 गुण कमावले. 8 / 8पण, ऐश्वर्याने चौथे स्थान पटकावताना 13 गुणांची कमाई केली, तर व्हिएराने तिसऱ्या स्थानासह 16 गुण कमावले. आणखी वाचा Subscribe to Notifications