Join us

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:53 PM

1 / 8
(सचिन लुंगसे) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (दक्षिण) एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील एकूण १११ हेक्टरपैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणी पूर्ण झाली आहे. तर, तटीय भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे.
2 / 8
या प्रकल्पात प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी, प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गाकडे (मरिन ड्राईव्ह) जाणारा बोगदा यापूर्वीच पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे देखील ३९ टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
3 / 8
अमेरिकेत पॅसिफिक कोस्ट हाईवे व हना हाईवे, ऑस्ट्रेलियात ग्रेट ओसीएन रोड, अटलांटिक ओसीएन रॉड-नॉर्वे, तसेच कॅनडा, फ्रांस, इटली, ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी कोस्टल रोड बांधले गेले आहेत. मात्र शास्त्रीय पद्धतीने रेक्लेमेशन करून यापूर्वी रस्ता बांधण्याचा प्रकल्प देशात झाला नाही.
4 / 8
शास्त्रीय पद्धतीने रिकलेमेशन करण्याची प्रक्रिया बहुतेक पहिल्यांदाच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या माध्यमातून होत असून, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या ९.९८ किमीमध्ये रेक्लेमेशन, बोगदे, पूल तयार करून रस्ता, प्रोमेनाईड, बगीचे, वाहनतळ, बस डेपो व इतर नागरी सुविधांचा समावेश आहे.
5 / 8
मुंबईच्या विकास आराखड्यात १९६७ पासून १९९१ पूर्व द्रुतगती व पश्चिम द्रुतगती मार्गाची रचना प्रस्तावित करण्यात आली. मुंबईच्या मंजूर झालेल्या २०३४ च्या विकास आराखड्यात किनारी रस्त्याचे प्रयोजन करण्यात आले.
6 / 8
२०११ साली शासनाने दक्षिण मुंबईपासून पश्चिम उपनगराच्या कांदिवलीपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करून वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी पर्यायी कोस्टल रोडचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त तांत्रिक समिती ३० जून २०११ रोजी गठित केली. २९ डिसेबर २०११ रोजी या समितीने कोस्टल रोड संबंधी विविध पर्याय असलेला अहवाल शासनास सादर केला.
7 / 8
संयुक्त तांत्रिक समितीने याप्रमाणे ३५.६ किमी लांबीच्या कोस्टल रोड - समुद्रकिनारी रेकलमशन (भराव), पूल, खांबावरील पूलरस्ता, बोगदे असा अंतर्भाव असलेला किनाऱ्यालगतचा कोस्टल रोडची शिफारस शासनास केली. समितीने शिफारस करताना वाहतूक समस्येवर पर्याय मिळेल.
8 / 8
अत्यंत गरज असलेल्या मनोरंजनासाठी किनारपट्टीवर मोकळ्या जागेची निर्मिती होईल या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला. आता बांधण्यात येत असलेला ४+४ मार्गिकेचा असलेला दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. याची तीन भागात विभागणी केली आहे. प्रस्तावित कोस्टल रोडच्या किनाऱ्याकडील बाजूस २० मीटर रुंदीचा सलग असा प्रोमेनाईड असेल.
टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका