Join us

'अटल सेतू'वर बंदी असतानाही घुसली रिक्षा; जाणून घ्या येथील प्रवासाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 3:46 PM

1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला आहे.
2 / 10
देशातील सर्वात लांब नाही, तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात मोठा पूल आहे. या पुलावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन आणि इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टमही आहे.
3 / 10
हा पूल बनवण्यासाठी मोठ्या ऑर्थॉट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पूल उभारण्यासाठी जास्त खांबाची गरज भासली नाही. भारतात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे.
4 / 10
या पुलाची एकूण लांबी २१.८ किमी असून, त्याचा १६.५ किमीचा भाग समुद्र आणि ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. हा पूल समुद्राच्या तळापासून १५ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे.
5 / 10
देशातील सर्वात लांब सागरी मार्ग असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि रहदारीचा विचार करुन येथील प्रवासासाठी काही अटी व नियम लावण्यात आले आहेत.
6 / 10
या पुलावरुन मोटरबाईक, मोपेड, थ्री-व्हीलर टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर तसंच धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नाही. बैलगाडीलाही परवानगी नाही.
7 / 10
मात्र, या पुलावरुन रिक्षा धावताना दिसली असून त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोनंतर अटल सेतूवरील प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
8 / 10
दरम्यान, या पुलावर कार, टॅक्सी, मिनी बस, हलकी वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करु शकतात.
9 / 10
या पुलाचा वापर केल्यास एकावेळी ५०० रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पण पुलावरुन प्रवास करताना टोल भरावा लागणार आहे.
10 / 10
जर तुम्ही एकाच बाजूचा टोल भरत असाल तर २५० रुपये भरावे लागतील. पण रिटर्नचाही काढला तर ३७५ रुपये होतील.
टॅग्स :MumbaiमुंबईSea Routeसागरी महामार्गauto rickshawऑटो रिक्षाSocial Viralसोशल व्हायरल