Join us

Aditya Thackeray : तो व्हायरल फोटो पाहून आदित्य ठाकरे अस्वस्थ झाले अन् ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 7:40 PM

1 / 8
शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे सोशल मीडियावर चांगलेच एक्टीव्ह असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेकदा त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवल्या आहेत.
2 / 8
कोरोना कालवधीत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची काळजी असो, वा एखाद्या रुग्णाची मदत मिळविण्यासाठीची धडपड असो, आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन दखल घेत प्रश्न मार्ग लावला आहे.
3 / 8
आदित्य ठाकरेंनी आता थेट नाशिक जिल्ह्यातील महिला भगिंनीची पाण्यासाठी होत असलेली फरपट पाहून तात्काळ याची दखल घेतली. तसेच, स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन प्रश्न मार्गी लावला.
4 / 8
पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो ही बातमी वाचून अस्वस्थ झालो. येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी साकव बांधण्याचे काम सुरू झाल्याचे आदित्य यांनी ट्विटरवरुन सांगितले.
5 / 8
येत्या २ दिवसात हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू, असे आश्वासनही आदित्य यांनी दिले आहे. तसेच, आदित्य ठाकरेंनी लोखंडी साकव बांधकामाचे फोटोही शेअर केले आहेत.
6 / 8
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील महिला भगिनींचा पाण्यासाठीचा सुरू असलेला जीवघेणा प्रवास वर्तमानपत्रात छापून आला होता. तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
7 / 8
आदिवासी भागातील नागरिकांसाठी असलेले जलजीवन मिशन महिलांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळेच, या महिलांची पाण्यासाठी अशी पायपीट होत असल्याचे या फोटोतून दिसून येत होते.
8 / 8
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या फोटोची दखल घेत येथील जीवघेण्याच जागेवर भक्कम लोखंडी साकव बांधून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं.
टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेNashikनाशिकWaterपाणीMumbaiमुंबई