Join us

Chitra Wagh: उर्फीनंतर वनिता अन् रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही चित्रा वाघ बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 7:59 PM

1 / 10
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, उर्फीने ई-मेलद्वारे महिला आयोगाला पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
2 / 10
चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकावले असल्याने आपल्या असुरक्षित वाटत असल्याचे उर्फीने या ई-मेलमध्ये म्हटले आहे. उर्फीची ही तक्रार महिला आयोग मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार आहे.
3 / 10
उर्फी जावेदच्या कपड्यांवर वारंवार आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. शनिवारी पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर रविवारी उर्फीने महिला आयोगाकडे एकप्रकारे वाघ यांच्याविरोधात अप्रत्यक्ष तक्रारच केली आहे.
4 / 10
दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उर्फीचे कुठल्याचप्रकारे समर्थन करता येणार नाही, असे म्हटले आहे. आजही पत्रकार परिषद घेत उर्फीच्या वर्तणुकीला आपण विरोधच केला पाहिजे, असे वाघ यांनी म्हटले. तसेच, भाजप तिला कधीही पक्षात घेणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
5 / 10
दरम्यान, चित्रा वाघ यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात व बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या न्यूड फोटोशूटबाबत प्रश्न विचारण्यात आला.
6 / 10
“हास्यजत्रेतील अभिनेत्री व चित्रपटातील एका अभिनेत्याने न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावर तुमचा आक्षेप नव्हता का?”, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला गेला. यावर उत्तर देताना त्यांनी मला याबाबत माहीत नाही असं म्हटलं.
7 / 10
“मला याबाबत माहीत नाही किंवा माझ्याकडे या विषयावर काही आलेलंही नाही. माझ्या विषयांवर मी लक्ष केंद्रीत करते. ज्या गोष्टी समोर येतात, त्याबाबत मी नेहमीच बोलते.
8 / 10
मनोरंजन विश्वाशी माझा संबंध नाही. उर्फीचा व्हिडीओही नऊ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पाठवला नसता, तर ही उर्फी कोण आहे? हे मला माहितच झालं नसतं. ज्या गोष्टी पटत नाहीत, त्याबाबतही मी बोलते. उर्फी याआधीही तोकड्या कपड्यांत फिरत होती. आताही फिरतेय, म्हणून मी याबाबत बोलतेय”, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं.
9 / 10
'आज जर हिला (उर्फी जावेदला) थांबवले नाही तर अशा १० जणी नग्न फिरतील. तेव्हा आपण काय करणार?'. 'मी पुन्हा एकदा सांगत आहे की, विरोध व्यक्तीला नाही तिच्या विकृतीला आहे. याला धर्म व आणखी काय काय बोलून वेगळा रंग आणायचा प्रयत्न करू नका' असेही त्यांनी म्हटलं.
10 / 10
दरम्यान, उर्फीने चित्रा वाघांना सोडून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा असं खास ट्विट केलं. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला असून उर्फी अधूनमधून ट्विट करत वाघ यांना डिवचत असते.
टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघUrfi Javedउर्फी जावेदRanveer Singhरणवीर सिंग