After the wedding safari, Vilasrao deshmukh went to the MLA's residence for the first time.
लग्नातला सफारी घालून विलासराव पहिल्यांदा आमदार निवासात गेले अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 9:08 AM1 / 12महाराष्ट्राच्या राजकारणात गावापासून दिल्लीपर्यंत आपली आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख ज्यांनी देशाला करुन दिली, त्या दिवंगत विलासराव देशमुख यांची आज जयंती. 2 / 12राजबिंडा पुढारी, ध्येयधोरणी नेता आणि जनसामान्यांचा लोकनेता अशी ओळख असलेल्या विलासरावांनी बाभळूगावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 3 / 12सरपंच ते केंद्रीयमंत्री व्हाया मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास सोप्पा नव्हता. पण मै चलता गया और कारवा बनता गया... अशीच त्यांच्या नेतृत्वाची ओळख राहिली आहे. लोकांनी त्यांना चालत-बोलत स्विकारलं. 4 / 12माणसांत रमणारा नेता म्हणून विलासरावांची ओळख होती, त्यामुळेच त्यांच्या आठवणी अनेकजण जागवतात. तेच किस्से सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. ते पहिल्यांदा आमदार झाल्यानंतरचा असाच एक किस्सा आहे. 5 / 12बाभूळगावचे सरपंचपद भूषवल्यानंतर ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच लातूर पंचायत समितीचे उप-सभापती होते. १९७९ मध्ये उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे संचालकपदही त्यांनी भूषवले होते. 6 / 12१९८० पासून ते खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात आले. सन १९८० साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८० साली विलासराव पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले. 7 / 12तेव्हा, मित्रांना सोबत घेऊन ते आमदार निवासात गेले, त्यावेळी लग्नातील सफारी त्यांच्या अंगावर होता तर त्यांच्या मित्राच्या अंगावर खादीचे कपडे. 8 / 12लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भूतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले. 9 / 12लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भूतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले. 10 / 12दुसऱ्या दिवशी, सकाळी चहा कॉफी झाली. रुमबॉयने विष्णू भूतडांनाच सॅल्युट ठोकला व बिल समोर केले. तेव्हा विष्णू भुतडा म्हणाले, “विलासराव आत्ता खादीचे कपडे शिवा. 11 / 12ही नकली आमदारकी मला परवडणारी नाही”. त्यावेळी सगळेच हसायला लागले. विलासरावांचा हा दिलदार आणि मिश्कीलपणा त्यांच्या भाषणातूनही अनेकांनी अनुभवलाय. 12 / 12म्हणूनच विलासराव यांच्या अकाली निधनानंतर लातूरसह महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications