Join us

मुंबईजवळच्या बूचर बेटावरील अग्नितांडव 40 तासांनंतर शमलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 2:38 PM

1 / 9
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बूचर आयलंड) तेलाच्या टाकीला शुक्रवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी वीज कोसळून आग लागली होती
2 / 9
तब्बल 40 तासांनंतर बूचर बेटावरील अग्नितांडव 40 तासांनंतर शमवण्यात अग्निशमन दलाला यश आलं
3 / 9
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अग्निशमन दल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी शर्थीचे प्रयत्न करून रविवारी (8ऑक्टोबर) संध्याकाळी आगीवर नियंत्रण मिळवलं
4 / 9
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल 40 तास लागल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात आलं
5 / 9
शुक्रवारी ( 6ऑक्टोबर ) जवाहर द्वीपावरील 13 क्रमांकाच्या डिझेलच्या टाकीला वीज कोसळल्यामुळे आग लागली.
6 / 9
शुक्रवारी रात्री आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले, परंतु उष्णतेमुळे टाकीमधील वाफेचा स्फोट होऊन टाकीने पुन्हा पेट घेतला होता
7 / 9
शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली
8 / 9
या अग्नितांडवानंतर धुराचे मोठ-मोठ लोट परिसरात पसरले होते
9 / 9
बूचर बेटावर इंधनाचे 15 ते 20 टँक आहेत
टॅग्स :Butcher Islandबूचर बेटfireआग