Join us

मनसे नेत्यांनी तरुण सैनिकाला खडे बोल सुनावले; पण पुढे भलतेच घडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:39 AM

1 / 8
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कंबर कसली असली तरी पक्षात नेते विरुद्ध दुसरी फळी यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षभरात मनसेचा चेहरा जनमानसात टिकवून ठेवण्याचे काम दुसऱ्या फळीने केल्याचे दिसून आले.
2 / 8
मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर हे गेल्या वर्षभरात फारसे सक्रिय नाहीत. कोरोनामुळे काही नेते तर सहा महिने घराबाहेर पडले नाहीत. मध्यंतरी ईडी चौकशीचा ससेमिरा काही मनसे नेत्यांच्या मागे लागल्याने अनेक नेत्यांनी भूमिगत होणे पसंत केले.
3 / 8
मात्र मनसेचे नेते संदीप देशपांडे, अखिल चित्रे, गजानन काळे अशा काही दुस-या फळीच्या मंडळींनी मनसे स्टाईलने व तरुणांचे लक्ष वेधणारी आंदोलने करुन पक्षाची पताका फडकत ठेवली आहे.
4 / 8
अगदी अलीकडेच अखिल चित्रे या तरुण मनसैनिकाने अ‍ॅमेझॉन कंपनीविरुद्ध मराठीच्या सक्तीकरिता आंदोलन केले. त्यावेळीही मनसे नेत्यांनी चित्रे यांना फोन करुन चार शब्द सुनावले.
5 / 8
महापालिका निवडणुकीत मनसे भाजपा युती होण्यात तुमच्या आंदोलनामुळे आडकाठी येऊ शकते. अ‍ॅमेझॉन कंपनी या आंदोलनास धूप घालणार नाही, असा या नेत्यांचा समज होता.
6 / 8
प्रत्यक्षात अ‍ॅमेझॉननी मराठीचा वापर करुन या नेत्यांना तोंडघशी पाडले व चित्रे यांचे आंदोलनाला मीडिया व सोशल मीडियात तुफान प्रतिसाद लाभला.
7 / 8
दरम्यान, राज्यात सुरू असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आणि आगामी काळात असणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून यात प्रमुख नेते, सरचिटणीसांना बोलवण्यात आलं आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे बैठक होणार आहे.
8 / 8
राज ठाकरेंनी पक्षसंघटन वाढीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे, यात राज ठाकरे वैयक्तिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, या बैठकीपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील स्थानिक राजकीय माहिती, समस्या आणि मनसेचे कार्य याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती.
टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेamazonअ‍ॅमेझॉनMaharashtraमहाराष्ट्रSandeep Deshpandeसंदीप देशपांडे