alia bhat and ranveer singh shoot at mumbais goregaon railway station
'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 3:20 PM1 / 6झोया अख्तरचा आगामी 'गल्ली बॉयज' या सिनेमाचं शूटिंग मुंबईतील गोरेगाव स्टेशनवर करण्यात आले. यावेळी आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह स्टेशनवर अगदी बिनधास्त फिरताना दिसले.2 / 6लाल रंगाचा टी-शर्ट, जीन्स, उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, हातात मोबाइल आणि बॅग अशा अवतारात आलिया एकदम मुंबईकर कॉलेज तरुणी वाटत होती.3 / 6नेहमी लोकल पकडण्यासाठी धावणा-या मुंबईकरांनीही गर्दीत आलियाला ओळखलं नाही.4 / 6सर्वसामान्य मुंबईकर तरुणीप्रमाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्म क्र.3वर आलिया लोकलची वाट पाहत असल्याचे दिसलं.5 / 6अभिनेता रणवीर सिंह चॉकलेटी टी शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये गोरेगावच्या पूलावर दिसला.6 / 6आलिया आणि रणवीरचा हा अंदाज इतका साधा होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications