Army launches Elphinstone Bridge ...
लष्करानं केली एलफिन्स्टन पुलाच्या कामाला सुरूवात... By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 8:41 PM1 / 9एल्फिन्स्टन पुलाच्या प्राथमिक कामाला आज लष्कराने सुरूवात केली आहे. 31 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं. (छाया - सुशिल कदम)2 / 9आता नव्या पुलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (छाया - सुशिल कदम)3 / 9मुंबईतल्या परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली होती. आणि या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. (छाया - सुशिल कदम)4 / 9पूल कोसळल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली आणि यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने नवीन फूट ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव मांडला. (छाया - सुशिल कदम)5 / 9एल्फिन्स्टन फूट ओव्हर ब्रिज एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रीज बांधण्याची जबाबदारी त्यानंतर भारतीय सैन्याकडे दिली गेली. (छाया - सुशिल कदम)6 / 9मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी एलफिन्स्टन पूलाची पाहणीही केली होती. (छाया - सुशिल कदम)7 / 9आता या एलफिन्स्टन ब्रिजच्या कामाला लष्करानं सुरुवात केलीय. (छाया - सुशिल कदम)8 / 9या पुलाची बांधणी झाल्यानंतर तरी आता वर्दळीचा प्रश्न सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (छाया - सुशिल कदम)9 / 931 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं.(छाया - सुशिल कदम) आणखी वाचा Subscribe to Notifications