केईएम रुग्णालयातील परिचारिका डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षे अरुणा शानबाग यांची शुश्रूषा केली होती. गेल्या वर्षी १८ मे रोजी अरुणा यांनी केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड क्र ४ मध्ये अखेरचा श्वास घेतला होता.अरुणा शानबाग यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.अरुणा शानबाग यांच्यावर एका वॉर्डबॉयने अतिप्रसंग केल्यामुळे त्या वेजिटेटिव्ह स्टेजमध्ये गेल्या होत्या.तब्बल ४२ वर्षे त्या याच स्थितीत होत्या पण केईएम रुग्णालयाच्या परिचारिका आणि डॉक्टरांनीच त्यांची सर्व काळजी घेतली होती.अरुणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी जिम सुरवात केलीपहिल्या स्मृतिदिनानिमित्त केईएम तर्फे रागोंळीच्या माध्यमातून अरुणाची प्रतिकृती काढण्यात आली