Join us

Aryan Khan drugs : 'त्या' लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, सुनिल पाटीलचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 7:12 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने समन्स बजावले आहे. एसआयटीने ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला आजच चौकशीसाठी बोलावल.
2 / 10
एनसीबीचे विशेष तपास पथक तपास करत असलेल्या 6 प्रकरणांमधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून आर्यन खानलाही आज समन बजावण्यात आले.
3 / 10
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला रविवारी सहा वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.(Aryan Khan Summon By NCB SIT) मात्र, याप्रकरणाता आता सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.
4 / 10
आर्यन खान(Aryan Khan) प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आता या प्रकरणात मलिकांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती.
5 / 10
आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि NCB अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. तसेच, मोहित भारतीय हा वानखेडेंचा माणूस असल्याचा आरोपही त्यांनी केला.
6 / 10
आता याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनिल पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हता. त्यामध्ये, मुनमुन धामेचा हिचं नाव होतं, पण आर्यनचं नव्हता असं सुनिल पाटील म्हणाले.
7 / 10
माझी एकच चूक आहे, सॅम डिसुझा, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांची ओळख करुन दिली. माझ्याकडे ड्रग्ज केसप्रकरणाची जी लिस्ट आली ती नीरज यादवकडून आली होती, नीरज यादव हे मध्य प्रदेशातील भाजप नेत्यांच्या जवळचे आहेत.
8 / 10
माझा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सुनिल पाटील यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले. तसेच, माझ्याकडे आलेल्या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं, माझ्याकडे ही लिस्ट मनिष भानुशालीकडून आली होती.
9 / 10
मी आता मुंबई पोलिसांसमोर जाणार आहे, कारण मला त्यांच्याकडून समन्स आले होते, असेही सुनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
10 / 10
आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर आहे. NCB ने 2 ऑक्टोबरच्या रात्री त्याला कॉर्डेलिया क्रुझवरून ताब्यात घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी अटक केली होती. आर्यनशिवाय, याप्रकरणी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती
टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोNCPराष्ट्रवादी काँग्रेसSunil Patilसुनील पाटीलnawab malikनवाब मलिक