Join us  

Aryan Khan Drugs : 'देश सोडून जाता येणार नाही, मुंबईबाहेर जाण्यासही परवानगी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 8:20 PM

1 / 12
मुंबईतील क्रुझ ड्रग्जपार्टी प्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे.
2 / 12
आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्या जामीन अर्जावरील निकालाची प्रत हायकोर्टाने जारी केली. त्यावर, प्रत्येकी १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देत कठोर अटीशर्तीही लागू केल्या आहेत.
3 / 12
निकालाची प्रत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NDPS कोर्टात सादर होताच कोर्ट सुटकेचे आदेश देणार आहे. त्यानंतर आर्यन खानची जेलमधून सुटका होऊन २६ दिवसांनी आपल्या घरी त्याची रवानगी होणार आहे.
4 / 12
१४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता.
5 / 12
1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन. एनडीपीएस अॅक्टच्याविरोधातील कुठल्याही उपक्रमात आरोपीचा सहभाग नसेल.
6 / 12
याप्रकरणातील कुठल्याही आरोपीशी, किंवा संबंधित सहआरोपी यांच्यासोबत कुठलाही संपर्क न करण्याचेही आदेश दिले आहेत. न्यायालयीन प्रकिया आणि तपासात हस्तक्षेप करेल, असे कुठलेही काम करता कामा नये.
7 / 12
आरोपींना तात्काळ आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करावा लागणार आहे, तसेच कोर्टाच्या आदेशानुसार देश सोडून कुठेही जाता येणार नाही.
8 / 12
आरोपींना मुंबईच्या बाहेर जायचे असल्यास, तपास अधिकाऱ्यांस पूर्वसूचना द्यावी लागेल. तसेच, जेथे जायचे आहे, त्याचा संपूर्ण तपशीलही द्यावा लागेल.
9 / 12
आरोपींना दर शुक्रवारी सकाळी 11 वाजता ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावावी लागेल. या प्रकरणाशी संबंधित खटल्यात न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे.
10 / 12
जेव्हाही एनसीबीचं समन्स पाठविण्यात येईल, तेव्हा हजर राहावे लागेल, तपासाला सहकार्य करावे लागेल
11 / 12
याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असेल, तेव्हा संबंधित खटल्यात उशीर करण्याचा प्रयत्न होता कामा नये.
12 / 12
जामीन अर्जदाराकडून कुठल्याही अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास एनसीबी स्पेशल जज कोर्टाकडे जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करू
टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खानAryan Khanआर्यन खानCourtन्यायालय