दादरच्या पुलाने घेतला मोकळा श्वास, फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:02 IST
1 / 5एलफिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आली असून रेल्वे पुलावर आणि पुलाखाली बसणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वेचा 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. 2 / 5पश्चिम आणि मध्य रेल्वेने कारवाईला सुरुवात केल्याने प्रवाशांकडून कौतुक होत आहे. फेरीवाल्यांमुळे नेहमी गजबजलेला असणारा दादर पश्चिमेकडील संपुर्ण परिसर मोकळा झाला असून, यामुळे आता प्रवाशांनाही चालताना त्रास होत नाहीये. 3 / 5दादर, बोरीवली, वसई, वांद्रे, ठाणे, कल्याण, कुर्ला, परळ, चिंचपोकळी, डोंबिवली आदी विविध स्थानकांवर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.4 / 5एरव्ही दादर पश्चिमेला जायचं म्हटलं तर तिथे असणा-या फेरीवाल्यांचा गर्दीतून वाट काढणे खूपच कष्टाचं काम होऊन बसायचं. रस्त्याच्या दोन्ही कडेला सोबतच मधोमध फेरीवाले असल्याने प्रवाशांना चालताना खूप त्रास व्हायचा. 5 / 5मध्य रेल्वेवर आरपीएफने दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, परळ, चिंचपोकळी, करीरोड स्थानकांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती नसावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.