Balasaheb Thackeray Memorial here are all you need to know about memorial
बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक नेमकं कसं असेल?; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अन् ४०० कोटींचा खर्च! जाणून घ्या.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 8:34 PM1 / 8दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 2 / 8शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे.3 / 8स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 4 / 8विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 5 / 8स्मारकासाठी भू-वापर तसेच पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.6 / 8करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.7 / 8स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी २५० कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.8 / 8बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश असणार आहे. यात स्मारकाची इमारत तर वैशिष्ट्य असेलच पण यासोबतच बाह्य सजावट, बागबगीचा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, लेझर शो, डीजिटल पद्धतीनं गोष्टी सांगणे अशा सुविधा देखील असणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications