bDD chawl redevelopment in Worli Luxurious flats with all amenities
PHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट... By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 11:28 PM1 / 8दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामाला आता सुरुवात झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाचा नारळ वाढवला गेला. 2 / 8वरळीतील बीडीडी चाळीत १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या नागरिकांना आता ५०० स्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅट मिळणार आहे. 3 / 8म्हाडाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असून यात बीडीडी चाळींच्या जागीत आता ४० मजली टॉवर उभे राहणार आहेत.4 / 8रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखान इत्यादी सुविधांसाठी या प्रकल्पात स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. तर प्रकल्पाच्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट देखील तयार करण्यात आला आहे. 5 / 8प्रत्येक सदनिका प्रशस्त आणि हवेशीर राहील यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक सदनिकेत ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिपाईड टाइल्स बसविण्यात येणार आहेत. 6 / 8एकूण ५०० स्वेअर फुटांचा फ्लॅट दिला जाणार असून यासाठी कोणतीही रक्कम घरमालकाला भरावी लागणार नाहीय. विनामूल्य पूनर्विकास केला जाणार आहे. 7 / 8खिडक्यांसाठी पावडर कोटिंगचे अॅल्युमिनिअम फ्रेमचा वापर केला जाणार असून प्रत्येक इमारतीमध्ये ३ पेसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट आणि एका फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. 8 / 8प्रकल्पात मलनि:स्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळमजला + ६ मजली पोडियम पार्किंग व्यवस्था असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications