Join us

लसीकरणाची 'ऑनलाईन नोंदणी' करताना सावधान, पोलिसांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 3:31 PM

1 / 10
राज्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणाने गती पकडली होती. मात्र, मागणीनुसार लस उपलब्ध होत नसल्याने महिन्याच्या मध्यावधीच लशींचा तुटवडा जाणवू लागला.
2 / 10
1 मे पासून 18 ते 44 वर्षांच्या नागरिकांना लस देण्यात येऊ लागल्याने पुन्हा मे महिन्यात पहिल्या आठवडयात लशींचा आकडा पुन्हा खाली आला.
3 / 10
एकीकडे पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर लोकांच्या रांगा लागत आहेत. केंद्रावर किती डोस उपलब्ध आहेत, याची माहितीही नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
4 / 10
ज्येष्ठ नागरिकांना तासन-तास रांगेत राहूनही लस मिळत नाही. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. तर, अनेकदा लस मिळविण्यासाठी हेलपाटे मारावेल लागत आहेत.
5 / 10
लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहता, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचीच मोठी गर्दी होताना दिसत आहे.
6 / 10
पहिला डोस घेऊन सात-आठ आठवड्यांचा कालावधी संपलेल्यांची, दुसरा डोस मिळावा यासाठी भटकंती सुरू आहे. त्यातच, नियोजित माहितीही न मिळाल्याने नागरिक त्रस्त होताना दिसत आहे.
7 / 10
अनेकजण लसीकरण केंद्रावर चौकशीसाठी येतात. परंतु लस कधी उपलब्ध होणार याबाबत केंद्रावरील कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने लसीकरणाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
8 / 10
लस उपलब्ध झाल्यानंतर दुसरा डोस मिळेल, असे सांगितले जाते. पण लस कधी उपलब्ध होईल, याबाबत शाश्वती नसल्याने स्थानिक प्रशासनाचीही कोंडी होत आहे.
9 / 10
दुसरीकडे लशींसाठी होणारी गर्दी पाहता, काही समाजकंटकांकडून फेक अॅप बनवून बोगस नोंदणीद्वारे नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे, पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
10 / 10
महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाकडून एक संदेश जारी करण्यात आला असून नागरिकांना फेक अॅप आणि शासनमान्य नसलेल्या कुठल्याही इंटरनेट प्रणालीशी आपली खासगी माहिती शेअर न करण्याचे सूचविण्यात आले आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस