Join us

ऑनलाइन जॉब शोधताना 'ही' घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:21 PM

1 / 7
सोशल मीडियावर नोकरी शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाइट्स उपलब्ध असतात. यापैकी काही वेबसाइट पैसे घेतात तर काही वेबसाइट फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाइटवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकही असतात.
2 / 7
जे खोटी वेबसाइट तयार करून संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात, त्यामुळे हे शोधताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. खात्री करून घ्या.वैयक्तिक माहिती देऊ नका ऑनलाइन जॉब शोधताना एखाद्या वेबसाइटवर जर ई-मेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, खाते क्रमांक, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका.
3 / 7
वैयक्तिक माहिती देऊ नका ऑनलाइन जॉब शोधताना एखाद्या वेबसाइटवर जर ई-मेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, खाते क्रमांक, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका.
4 / 7
लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत. कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाइटला नक्की भेट द्या आणि बघितलेला जॉब खरेच आहे का, याची खात्री करा.
5 / 7
वेब सिक्युरिटी तपासा ओपन केलेल्या वेबसाइटचे वेब पेज सिक्युअर आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखणे खूप सोपे आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असे असेल. अशा प्रकारे काळजी घेतल्याने वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही.
6 / 7
प्रायव्हसीकडे लक्ष द्या प्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या युजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी ठेवतात. यात नाव, ई-मेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बऱ्याच वेबसाइट सोशल सिक्युरिटी देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो, अशा साइट विश्वसनीय असतात.
7 / 7
वेळीच तक्रार करा कोणत्याही कारणास्तव जर साइटवरून खासगी माहिती चोरीला गेली किंवा पैसे चोरीला गेले तर गप्प बसू नका. पोलिस ठाण्यात वा सायबर पोलिस सेलमध्येही तक्रार नोंदविली जाऊ शकते.
टॅग्स :jobनोकरीSocial Mediaसोशल मीडियाonlineऑनलाइन