Beware of cyber hackers, do this before accepting a friend request
सायबर भामट्यांपासून सावधान, फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारण्यापूर्वी 'हे' कराच By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 3:44 PM1 / 10सायबर भामटे तुमच्या सोशल मीडियावरील विशेषतः फेसबुकवर पाळत ठेवतात. मग तुमच्या एखाद्या परिचित व्यक्तीच्या सोशल मीडियावरील उपलब्ध फोटोज व अन्य माहितीच्या आधारे त्याचे फेक प्रोफाईल बनवितात व तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. 2 / 10त्याबरोबर एक मेसेज पण येतो की माझा आधीचा अकाउंट हॅक झाल्यामुळे हा नवीन अकाउंट आहे. 3 / 10सर्वसामान्य नागरिक यावर विश्वास ठेवून ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतात. मग या अकाउंटवरून कधी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर एखादे चुकीचे ऍप डाउनलोड करायला सांगितले जाते व आपण तसे केल्यास मोबाईल किंवा लॅपटॉपचा कंट्रोल या सायबर भामट्यांकडे जातो. 4 / 10ते त्याद्वारे तुमचा सर्व डेटा घेऊ शकतात किंवा बँक खात्यातील पैसे दुसरीकडे वळवू शकतात.5 / 10महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना विनंती करते की, सोशल मीडिया विशेषतः फेसबुक वापरताना सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तसेच आपल्या सर्व फोटोज व फोटो अल्बमची प्रायव्हसी सेटिंग अपडेट करा. 6 / 10महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना विनंती करते की, सोशल मीडिया विशेषतः फेसबुक वापरताना सावध राहा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका. तसेच आपल्या सर्व फोटोज व फोटो अल्बमची प्रायव्हसी सेटिंग अपडेट करा. 7 / 10त्यामुळे कोणीही तुमचे फोटो डाऊनलोड करू शकणार नाहीत. तसेच आपल्या फेसबुक फ्रेंडकडून एक प्रोफाईल असताना दुसऱ्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारण्याआधी त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अन्य मार्गाने संभाषण करा. 8 / 10ती रिक्वेस्ट त्या व्यक्तीनेच पाठविली आहे याची खात्री करा व मगच स्वीकारा. अन्यथा ते प्रोफाईल ब्लॉक करा. 9 / 10फक्त सोशल मीडियावर नाही तर आपल्या परिचित किंवा मित्र यादीतील व्यक्तींबरोबर ई-मेल, व्हाट्सऍपद्वारे किंवा फोन करून पण संपर्कात राहा.10 / 10तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करा, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications