Join us

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! कांजूरमार्ग कारशेड मेट्रोसाठी व्यवहार्य नाही; MHAचा निष्कर्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:56 PM

1 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले.
2 / 9
यावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मात्र, MMRDA ने कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही, असे म्हटले आहे.
3 / 9
यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्रायलाचे एक पत्र ट्विट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 / 9
शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला असून, आरे वाचवा हे आंदोलन पुन्हा सुरू केले. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दिला.
5 / 9
राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेकांकडून विरोध असताना किरीट सोमैयांनी केंद्रीय गृहनिर्माण विभागाने तत्कालिन महाविकास आघाडी सरकारला लिहिलेले पत्र ट्वीट केले आहे. कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही, असे केंद्रीय गृहनिर्माण विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते.
6 / 9
DMRC आणि M/s Systra यांच्या १४ ऑक्टोबर आणि २३ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत कांजूरमार्ग कारशेड एकापेक्षा जास्त मेट्रोसाठी वापरणे व्यवहार्य नाही. या निर्णयावर दोघांनीही सहमती दर्शवली.
7 / 9
तसेच कांजूरमार्ग येथे येणाऱ्या दर ३ ते ४ मिनिटांनी येणाऱ्या मेट्रोचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवणे धोकायदायक असेल, त्यामुळे आरेमधून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बांधण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, असेही या पत्रात म्हटले आहे.
8 / 9
नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड आरे येथे करण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय रद्द केला. हा प्रकल्प आरे येथून कांजूरमार्ग येथे हलविण्यात येणार असल्याचे घोषित केले. तसेच आरेतील सुमारे ८०० एकर जमीन राखीव वन म्हणून घोषित करण्यात आली.
9 / 9
त्यानंतर १७ मार्च २०२० रोजी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने तत्कालीन महाराष्ट्र सरकारला तीन पानी पत्र लिहिले होते. या पत्रात आरेतून कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड हलवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, असे म्हटले होते.
टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयKirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेMetroमेट्रोPoliticsराजकारण