Blossom season of Basant Rani trees in Mumbai
मुंबईत 'बसंत' बहार By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 3:27 PM1 / 5बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात व विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणा-या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. 2 / 5या झाडांमध्ये 'बसंत रानी' या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी देखील फुलांनी बहरलेली'बसंत रानी' ची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत.3 / 5या झाडांना पाणी देणे व वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केली जातात.4 / 5महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. 5 / 5हिंदी भाषेत 'बसंत रानी' अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव 'टॅब्यूबिया पेंटाफायला' (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea)असे आहे. या झाडाला इंग्रजीमध्ये'पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा'या नावांनीही ओळखले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications