Join us

मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 11:56 PM

1 / 7
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाऊन पूजाअर्चा केली जाते. (छाया- सुशील कदम)
2 / 7
मुंबईतल्या वाळकेश्वरमधील बाणगंगा येथेही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
3 / 7
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला होता. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला.
4 / 7
त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना.
5 / 7
देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले.
6 / 7
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.
7 / 7
या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा केला गेलाय.
टॅग्स :Mumbaiमुंबई