Join us

रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात रेल्वे अॅप्रेंटिस आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:14 AM

1 / 16
मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली होती.
2 / 16
तब्बल साडेतीन तासांनंतर आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले व सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला.
3 / 16
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या.
4 / 16
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
5 / 16
आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
6 / 16
सकाळी 7 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या होत्या.
7 / 16
आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.
8 / 16
याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला.
9 / 16
रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
10 / 16
पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला होता.
11 / 16
दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत पोलिसांनी लाठीचार्च केल्यानं विद्यार्थ्यांनी लोकलवर दगडफेकही केली होती.
12 / 16
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिला
13 / 16
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिला
14 / 16
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिला
15 / 16
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिला
16 / 16
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिला
टॅग्स :Mumbai Rail Rokoमुंबई रेल रोकोcentral railwayमध्य रेल्वे