भारतीय लष्काराने उभारलेल्या पुलांचं मुख्यमंत्री-रेल्वेमंत्र्यांकडून लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 21:46 IST
1 / 5मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर भारतीय लष्कराने उभारलेल्या तीन पादचारी पुलांचं लोकार्पण करण्यात आले आहे. 2 / 5रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते या पुलांचे लोकार्पण झाले.3 / 5मुंबई उपनगरीय रेल्वेवरील आंबिवली, करी रोड आणि एल्फिन्स्टन-परळ या स्थानकांना जोडणारे पादचारी पूल लष्कराने बांधले. 4 / 5एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इतर दोन पुलांचं लोकार्पण करण्यात आले.5 / 5विशेष म्हणजे, एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अरविंद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ असा लोकलने प्रवास केला.