Chief Minister Eknath Shinde's morning walk on Marine Drive, officers started work
Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा मरीन ड्राईव्हवर मॉर्निंग वॉक, अधिकारी लागले कामाला By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 2:16 PM1 / 8मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे दररोज मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 2 / 8यासमयी विधानसभा अध्यक्ष आणि या भागाचे आमदार राहुल नार्वेकर, राज्याचे पर्यटन, पर्यावरण तसेच मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल तसेच मुंबई मनपाचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.3 / 8मरीन ड्राईव्ह येथे दररोज हजारो मुंबईकर फेरफटका मारायला येतात, पण या तुलनेत याठिकाणी फक्त एकच स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाची साफसफाई आणि नीटनेटकेपणाची पाहणी केली. 4 / 8तसेच या स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच मरीन ड्राईव्ह जेट्टीकडील भाग हा सुंदर आणि सुशोभित करण्याबाबतही पालिका अधिकाऱ्यांना सुचित केले. 5 / 8कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा देखील याप्रसंगी आढावा घेतला. या मार्गाचे काम वर्षाखेरीस पूर्ण होणार असून त्यानंतर तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती यावेळी बोलताना दिली. 6 / 8मुंबई हे सुंदर आणि सुशोभित करून ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून ओळखले जावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.7 / 8मुंबईचा मरीन ड्राईव्ह परसर म्हणजे पर्यटकांचं आकर्षक ठिकाण असून गेट वे ऑफ इंडियाजवळील हा परिसर मॉर्निंग वॉकसाठीही प्रसिद्ध आहे. 8 / 8त्यामुळेच, येथील परिसर कायम स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त करत अधिकाऱ्यांना निर्देशित केले आणखी वाचा Subscribe to Notifications