Join us

मुख्यमंत्र्यांनी पियूष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत केली एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 2:30 PM

1 / 5
एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज भारतीय सैन्याकडून बांधला जाणार आहे. एल्फिन्स्टन, करीरोड, आंबिबलीचे पूल मिलिटरी बांधणार आहे.
2 / 5
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.
3 / 5
5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत पुलाचं बांधकाम पुर्ण करण्यात येणार आहे.
4 / 5
भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाप्रकारचे ब्रीज बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा ब्रिज बांधला जाईल.
5 / 5
यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता.
टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनpiyush goyalपीयुष गोयलDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे