Chinchpokli cha Chintamani Aagman Sohala 2019 Mumbai
Chinchpokli Cha Chintamani 2019: आम्ही शंभरीचे साक्षीदार... चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन थाटामाटात By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 5:48 PM1 / 12मुंबईत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे आगमन होत आहे.2 / 12मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास दणक्यात सुरुवात झाली आहे.3 / 12यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 100 वं वर्ष आहे. 4 / 12करी रोड येथील खातूंच्या कार्यशाळेतून निघालेल्या चिंतामणीचे फोटो काढण्यासाठी हजारो तरुण व तरुणी एकवटले आहेत.5 / 12गणेश टॉकीजपासून चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 6 / 12चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळानेदेखील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. 7 / 12बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनीही गर्दी केली आहे.8 / 12सामाजिक कार्याचा वसा जपत या मंडळाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पुरस्थितीनंतर बेघर झालेल्या पूरग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. 9 / 12चिंतामणीच्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होताना दान करण्याचं आवाहन केलं आहे. 10 / 12आगमन सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या मदतीला वेगळ्या ओळखपत्रासह 200 स्वयंसेवकांसह 1 हजार सहाय्यक सदस्य यांची फौज आणि मंडळाचे 125 कार्यकारिणी सदस्य आहेत. 11 / 12आगमन सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या मदतीला वेगळ्या ओळखपत्रासह 200 स्वयंसेवकांसह 1 हजार सहाय्यक सदस्य यांची फौज आणि मंडळाचे 125 कार्यकारिणी सदस्य आहेत. 12 / 12आगमन सोहळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या मदतीला वेगळ्या ओळखपत्रासह 200 स्वयंसेवकांसह 1 हजार सहाय्यक सदस्य यांची फौज आणि मंडळाचे 125 कार्यकारिणी सदस्य आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications