Join us

चित्रा वाघ यांची संजय राऊतांविरुद्ध पुन्हा डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 5:43 PM

1 / 10
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांची मुस्कटबादी होत असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी राऊत यांना लक्ष्य केले.
2 / 10
पत्रकारांची मुस्कटदाबी तुमच्या महाविकास आघाडी सरकारकडूनच झाली आहे. कोविडमुळे एका पत्रकाराचा पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू झाला, त्याच्या कुटंबाकडे अद्यापही सरकारने पाहिलं नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
3 / 10
चित्रा वाघ यांनी बंडा तात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, औरंगजेबाने जे नाही केलं, ते महाविकास आघाडी सरकारने केलं.
4 / 10
वारकऱ्यांचा भगवा खांद्यावर घेवून जाणाऱ्या वारकऱ्याला पोलीस एका गुन्हेगारासारखी वागणूक देतात. संजयजी, ही मुस्कदाबी नाहीतर दुसरं काय? असा सवाल वाघ यांनी विचारला आहे.
5 / 10
तुम्ही तुमचं हिंदूत्त्व काँग्रेसच्या खुंटीला अडकवून ठेवलं, असा घणाघात वाघ यांनी शिवसेनेवर केला. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
6 / 10
संजय राऊत यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांची तुलना कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यासोबत केली होती. त्यावरुनही, वाघ यांनी संजय राऊत यांना सुनावले.
7 / 10
नरेंद्र मोदी हे नक्षलवाद्याना रसद पुरविणाऱ्या चीनलाही घाबरत नाहीत, मग यांना स्वप्नात तरी घाबरत असतील का, असे म्हणत सामनातून स्वामी यांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या लेखाचा समाचार घेतला.
8 / 10
यापूर्वीही चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. चित्रा वाघ म्हणाल्या की, तुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा आहे.
9 / 10
मग तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल. तुम्ही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल जे काही बरळलात, त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामना संपादकपदाचा काय संबंध आहे ते सांगा.
10 / 10
मग मी स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा काय संबंध याचा खुलासा करेन. तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा त्यांनी दिला होता.
टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघcorona virusकोरोना वायरस बातम्याSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना