Join us

CM Eknath Shinde: धमकीच्या फोनवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 5:10 PM

1 / 6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.
2 / 6
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. या अनुषंगाने पोलिस आता तपास करत आहेत.
3 / 6
काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
4 / 6
सदर प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धमकीचे मला अनेकदा फोन आले. माझ्यावर अशा धमकींचा परिणाम होत नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच पोलीस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
5 / 6
गेल्या महिन्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र आलं होतं. त्यासंबंधीही पोलिस तपास करत आहेत. आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवरहोणार आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील, अशी माहिती मिळत आहे.
6 / 6
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल, असा इशारा भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस