Join us

छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 12:33 PM

1 / 6
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.
2 / 6
शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.
3 / 6
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुलाबा येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
4 / 6
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे समर्थक गटानं विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
5 / 6
आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली.
6 / 6
माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार