Join us

'मिठी'खालून धावणार मेट्रो; पाहा, 'अंडरग्राउंड' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 10:13 AM

1 / 12
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गिकेतील सर्वात महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असलेले मिठी नदीच्या खालून करण्यात येत असलेले भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) सुरू असून आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. (सर्व फोटो - दत्ता खेडेकर)
2 / 12
1.5 किमी भुयारीकरणापैकी 900 मीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) ते धारावी दरम्यान 90 टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
3 / 12
बीकेसी परिसरामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र आणि अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने येथे मोठी वर्दळ असते. मेट्रो-3 कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना या ठिकाणी सहज पोहोचणे शक्य होणार आहे.
4 / 12
बीकेसी येथील भुयारीकरण टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) तसेच पारंपरिक एनएटीएम पद्धतीचा वापर करून करण्यात येत आहे. या स्थानकासाठी मिठी नदीच्या खालून भुयारीकरण केले जात आहे.
5 / 12
मिठी नदीखालून केले जाणारे भुयारीकरण ‘अर्थप्रेशर बॅलन्स’ पद्धतीच्या टीबीएमद्वारे आणि काही भागातील भुयारीकरण हे एनएटीएम पद्धतीचा वापर करून करण्यात येत असल्याचे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले.
6 / 12
एनएटीएमद्वारे भुयारीकरण तीन भागांत करण्यात येणार आहे. टॉए हेडिंग, बेचिंग व इन्व्हर्टर, पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून दगडाला आधार दिला जातो.
7 / 12
लहान एस्के वेटरचा वापर करून कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे मिठी नदीखाली बोगदे बनविण्यात येणार आहेत. बीकेसी स्थानक 18 मीटर खोल असून त्याची लांबी 474 मीटर आहे. या स्थानकांत दोन स्टेबलिंग लाइन्स असणार आहेत.
8 / 12
कफ परेड ते बीकेसी दरम्यान अधिक प्रमाणात गाड्या धावणार असल्याने या स्थानकामध्ये तीन मार्ग आहेत. गर्दीच्या वेळी गाड्यांचे जलद संचलन होण्यासाठी या लाइन्स उपयुक्त ठरतील.
9 / 12
मिठी नदीखालून तीन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी दोन टीबीएमद्वारे तर एक 153 मीटर लांबीचा बोगदा एनएटीएमद्वारे बांधण्यात येत आहे.
10 / 12
पॅकेज-5 अंतर्गत बीकेसीसह धारावी, विद्यानगरी आणि सांताक्रुझ स्थानकेदेखील येतात. या पॅकेजचे एकूण 89 टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
11 / 12
पॅकेज-5 अंतर्गत बीकेसीसह धारावी, विद्यानगरी आणि सांताक्रुझ स्थानकेदेखील येतात. या पॅकेजचे एकूण 89 टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
12 / 12
पॅकेज-5 अंतर्गत बीकेसीसह धारावी, विद्यानगरी आणि सांताक्रुझ स्थानकेदेखील येतात. या पॅकेजचे एकूण 89 टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईriverनदी