corona cases increase in mumbai here is the ward wise list
मुंबईकरांनो सावधान! 'हे' ९ विभाग अजूनही 'डेंजर झोन'मध्ये; कोरोनाला हलक्यात घेऊ नका By मोरेश्वर येरम | Published: February 13, 2021 2:00 PM1 / 10मुंबईतील ९ विभागांमध्ये कोरोनाचे (Corona in Mumbai) सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. शहराच्या सरासरीपेक्षा मुंबईतील या विभागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये ०.१३ टक्के वाढ झाली आहे. 2 / 10मुंबईतील एफ उत्तर, एम पश्चिम, एल, आर मध्य, आर पश्चिम, पी उत्तर, के पश्चिम, टी आणि एस या विभागांमध्ये कोरोनाची अधिक रुग्णसंख्या आहे. 3 / 10आश्चर्याचीबाब अशी की जास्त रुग्णसंख्या ही झोपडपट्टी नसलेल्या भागांतील आहे. यात पूर्व उपनगरामधील ५, पश्चिमेकडील ३ आणि मध्य मुंबईतील १ अशा प्रभागांचा समावेश आहे. 4 / 10मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या टिळक नगर, घाटकोपर, कुर्ल्यातील नेहरु नगर, विक्रोळी आणि भांडूप परिसरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 5 / 10मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, अंधेरी आणि जोगेश्वर (पूर्व) येथेही कोरोना रुग्ण संख्या अधिक आहे. 6 / 10लोकांची वाढलेली रहदारी, बाजारपेठा, लोकल सेवा, बस सेवा यांमध्ये वाढलेली गर्दी यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. 7 / 10मुंबईतील ज्या प्रभागांमध्ये रुग्ण वाढ होत आहे तेथे ८० टक्के रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. 8 / 10चेंबूर आणि टिळक नगर येथे मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ होत असल्याचं दिसून येत आहे. येथील रुग्णवाढीचा दर सरासरी ०.२१ टक्के इतका आहे. 9 / 10त्यानंतर एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा सरासरी दर ०.१७ टक्के इतका आहे. 10 / 10मुंबईत रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून येत असल्यानं चिंता व्यक्त केलीय जातेय. पण नागरिकांनी घाबरुन न जाता जास्तीत जास्त काळजी घेणं आणि शासनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications