1 / 10राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे.2 / 10देशातील रुग्णसंख्येचा विचार केल्यास एक तृतीयांश कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. यावरुन भाजपा सातत्यानं ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे.3 / 10भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज्य सरकारला लक्ष्य करत आहेत.4 / 10मुंबईतील रुग्णालयांचे व्हिडीओ ट्विट करून सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका केली.5 / 10यानंतर आता किरीट सोमय्या यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी एका महिला पोलीस हवालदाराची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.6 / 10मुंबईतल्या ग्रँट रोड परिसरातील आर. के. हॉटेल जवळ कोरोनाग्रस्त महिला पोलीस हवालदार रुग्णवाहिकेची वाट पाहत आहे. तिला श्वास घेण्यात समस्या येत आहेत. संबंधित महिला अतिशय अडचणीत असल्याचं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं.7 / 10सोमय्या यांच्या ट्विटला थोड्याच वेळात मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उत्तर मिळालं. 8 / 10'आम्ही तुमची चिंता समजू शकतो सर. पण हा जुना व्हिडीओ (१६ मे २०२०) असून त्याचा कोविड-१९ शी संबंध नाही. संबंधित महिला कोरोना योद्ध्याची प्रकृती उत्तम असून तिची कोरोना चाचणी कधीच पॉझिटिव्ह आली नव्हती,' असं उत्तर मुंबई पोलिसांनी सोमय्यांना दिलं.9 / 10सत्यता न पडताळता कोणताही मजूर शेअर करू नका, असं आवाहन आम्ही सर्व नागरिकांना करतो, असंदेखील मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये केलं.10 / 10यानंतर किरीट सोमय्यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं. सध्या मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर पोलिसांकडून करण्यात आलेलं ट्विट दिसत आहे. मात्र सोमय्यांनी ट्विट डिलीट केल्यानं 'हे ट्विट उपलब्ध नाही,' असा मेजेस दिसत आहे.