CoronaVirus Live Updates mumbai corona virus omicron sub variant swab test jumbo covid centre
CoronaVirus Live Updates : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:14 PM1 / 12वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे.2 / 12देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8822 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 524792 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 3 / 12मुंबईकरांसाठी आता धोक्याची घंटा आहे. कारण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. नव्या रुग्णांची संख्या एका हजाराहून अधिक आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे थैमान पाहायला मिळत आहे. 4 / 1212 व्या जीनोम सीक्वेंसिंग दरम्यान स्वॅब टेस्टचा जो रिझल्ट समोर आला आहे तो चिंताजनक आहे. स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 14 ते 24 मे पर्यंत करण्यात आलेल्या जीनोम सीक्वेंसिगमध्ये 279 लोकांचे सँपल टेस्टसाठी पाठवले होते. 5 / 12279 मधील तब्बल 278 लोक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित आहेत. एका रुग्णाला डेल्टा स्ट्रेनची लागण झाली आहे. बीएमसीच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सँपलमधील 202 हे मुंबईचे होते. 6 / 12बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, फक्त मुंबईत 202 मधून 201 स्वॅबच्या सँपलचं परीक्षण केल्यास कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाली. हा आकडा जवळपास 99.5 टक्के आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 7 / 12महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजच्या रोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. आता राज्यात ओमायक्रॉनचे सब-व्हेरिअंट BA.4 आणि BA.5 चे तीन रुग्ण समोर आले आहेत. 8 / 12सरकारने जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याच बरोबर, परिस्थिती पाहता, पुन्हा एकदा मुंबईमध्ये काही जम्बो सेंटर्स एक्टिव्ह केले जात आहेत. तसेच या सेंटर्सना अलर्ट मोडवर राहण्यासही सांगण्यात आले आहे.9 / 12राज्यात ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने सरकार अलर्ट झाले आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, BA.4 आणि BA.5 चे तिन्ही रुग्ण होम आयसोलेशनमध्येच बरे झाले आहेत. 10 / 12मुंबईत याआधी जम्बो सेंटर्स तयार करण्यात आले होते. यामुळे जनतेला मोठा दिलासाही मिळाला होता. आता मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच, या जम्बो सेंटर्सना एक्टिव्ह होण्यास सांगण्यात आले आहे.11 / 12मुंबईतील मालाड भागातील जम्बो कोविड सेंटरमध्ये तयारीही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना मालाड कोविड सेंटरचे डीन म्हणाले, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही ऑक्सिजन सिलिंडर भरले आहेत. 12 / 12जर परिस्थिती बिघडली, तर आम्ही 2 दिवसांत लोकांच्या मदतीसाठी पूर्णपणे तयार राहू. सध्या आमच्याकडे कोविड वॉर रूमसाठी 11 डॉक्टरही आहेत. तसेच, परिस्थिती बिघडलीच तर काही डॉक्टरांना स्टँडबाय देखील ठेवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications