CoronaVirus Marathi News 3 year child raises 50 thousand mumbai police SSS
CoronaVirus News : 'या' चिमुकल्याची बातच न्यारी; वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 2:25 PM1 / 16जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.2 / 16भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 2400 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 78,000 हून अधिक झाली आहे. 3 / 16कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. 4 / 16देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी एका चिमुकल्याने मदतीचा हात दिला आहे.5 / 16कोरोनाच्या या लढ्यात मुंबईतील एका 3 वर्षांच्या चिमुकल्याने कपकेक विकून जमा केलेले पैसे हे मुंबई पोलीस दिले आहेत. 6 / 16कबीर असं या चिमुकल्याचं नाव असून आपल्या कमाईचे पैसे पोलिसांना दिल्यामुळे त्याने सर्वांचंच मन जिंकलं आहे. कबीरने 50 हजार रुपयांचा चेक दिला आहे. 7 / 16मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक सुंदर व्हिडीओ पोस्ट करून कबीरचं कौतुक करत याबाबत माहिती दिली आहे. सोशल मीडियावरही कबीरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.8 / 16आपल्या आईच्या मदतीने कबीरने घरीच कपकेक तयार केले आणि ते विकून पैसे कमावले. 9 / 16कबीर आपल्या आई-बाबांसह पोलिस मुख्यालयात पोहोचला आणि त्याने एकूण 50 हजारांचा चेक हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 10 / 16'3 वर्षांच्या या बेकरकडे मुंबई पोलिसांसाठी मोठं सरप्राईज होतं. कबीरने त्याच्या कमाईतून मुंबई पोलीस फाऊंडेशनसाठी एक मोठं योगदान दिलं आहे' असं पोलिसांनी म्हटलं आहे. 11 / 16कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.12 / 16कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.13 / 16कबीरला 10 हजार रुपये कमवायचे होते. मात्र कपकेक विकून त्याने कमवायचे होते त्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.14 / 16काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशमधील एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले 971 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले होते.15 / 16हेमंत असं या चिमुकल्याचं हेमंतने सायकल विकत घेण्यासाठी काही पैसे साठवले होते. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असल्यामुळे त्याने सायकलसाठी साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले.16 / 16विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचं कार्यालय आहे. तिथे जाऊन चार वर्षाच्या हेमंतने आपले सायकलसाठी जमा केलेले 971 रुपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले. यामुळे चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications