CoronaVirus in mumbai: Gudhi Padwa, Marathi new year in fear of coronavirus hrb
CoronaVirus: नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट; पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांची पाठ By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 7:46 PM1 / 10उद्या मराठी नववर्ष सुरू होत आहे. मात्र, नागरिकांच्या उत्साहावर कोरोनाने विरजण घातले आहे. 2 / 10मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजीपाला, दूध आदी ठिकठिकाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. 3 / 10दुसरीकडे उलट चित्र दिसत आहे. पनवेलमध्ये भाजीमार्केटमध्ये तोबा गर्दी उसळत आहे. 4 / 10पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. कारण दुकानेच बंद आहेत. 5 / 10गुढी पाडवा साजरा करण्यासाठी बाजारात काही गाड्यांवर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. 6 / 10मात्र, लोकांनी तिकडे न जाण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे दरवर्षी गर्दी होणाऱ्या गाड्यांवर तुरळक ग्राहक दिसत आहेत.7 / 10पाडवा साजरा करण्यासाठी ऊस, फुलं, आंब्याची पाने, कडुनिंबाचा पाला, साखरेच्या गाठी असे साहित्य लागते. 8 / 10मात्र, यंदा मागणीच नसल्याने शेतकऱ्यांसह इतरांचे नुकसान झाले आहे. 9 / 10मुंबईतील दादर फुलमार्केटही बंद आहे. यामुळे उद्या पाडवा साजरा करण्यासाठी फुलांची टंचाई जाणवणार आहे. 10 / 10मुंबईत नेहमीच्या वर्दळीच्या रेल्वेस्थानकांवर देखील चिटपाखरू नाहीय. आणखी वाचा Subscribe to Notifications