Join us

Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 9:26 AM

1 / 13
देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेली पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 13
कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.
3 / 13
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे.
4 / 13
मुंबईत गेल्या 24 तासांत केवळ 504 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 736 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत 13 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 15 हजार 612 इतका झाला आहे.
5 / 13
मुंबईत कोरोनाचे 7 हजार 484 उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून, रुग्णवाढीचा दर 0.07 टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी 909 दिवसांवर गेला आहे.
6 / 13
राज्यात कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती असताना मुंबईतून एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतून आता सुखावणारी माहिती मिळत आहे.
7 / 13
कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील कोविड रुग्णालयातील बेड खाली होत आहेत.
8 / 13
एका रिपोर्टनुसार, मुंबईच्या कोविड रुग्णालयातील जवळपास 85 टक्के बेड हे सध्या रिकामे आहेत. डॉक्टर्स या ठिकाणी पुन्हा एकदा रेग्युलर हेल्थ चेकअप सुरू करण्याचा विचार करत आहेत.
9 / 13
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मुंबईतील 23,270 कोविड बेडमधील जवळपास 19411 बेड हे शुक्रवारी रिकामे होते. त्यातील 18300 हून अधिक बेड हे जंबो, खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयातील होते.
10 / 13
जवळपास 85 टक्के आयसोलेशन बेड, 55 टक्के आयसीयू बेडवर कोणताच रुग्ण नाही. तर व्हेंटिलेटर सपोर्टवाले 47 टक्के बेड खाली असल्याची माहिती रिपोर्टमधून देण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 13
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 6 हजार 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 96.05 टक्क्यांवर गेला आहे.
12 / 13
गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 8 हजार 296 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 6 हजार 466 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के इतका आहे.
13 / 13
राज्यात एकूण 4 कोटी 38 लाख 139 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 61 लाख 49 हजार 264 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात 5 लाख 85 हजार 580 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 4 हजार 737 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटल