Coronavirus: This route is dangerous, as local travel is banned
Coronavirus: हा मार्ग धोक्याचा, लोकल प्रवास बंदी असल्याने प्रवासी पत्करताहेत धोका By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 8:16 PM1 / 6कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महिन्यात सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे पुन्हा एकदा बंद झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास बंदच आहे. 2 / 6दरम्यान, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या नागरिकांनाच राज्य शासनाने रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तरीही अत्यावश्यक सेवेत नसणारे काही प्रवासी नियमभंग करून लोकलमधून प्रवास करत आहेत. 3 / 6अनेक रेल्वे स्थानकांमधून शेकडो विनातिकीट प्रवास करत असून, टीसी तसेच रेल्वे पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी अनेक प्रवासी लोकलमधून उतरल्यावर ट्रॅकमधून उड्या टाकून तसेच आडवाटेने स्टेशनबाहेर जात आहेत. 4 / 6काही प्रवासी रेल्वेतून प्रवास केल्यावर फलाटावर उतरल्यानंतर शॉर्टकट म्हणून मागूनच रेल्वे ट्रॅक ओलांडून जात आहेत.5 / 6तर काही प्रवासी आपला जीव धोक्यात घालून पुलाच्या खांबांचा आधार घेऊन रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला जात आहेत. 6 / 6दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने मुंबईतील लोकलसेवा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कामावर अनेक नोकरदारांना नियमभंग करून लोकल प्रवासाचा पर्याय निवडावा लागत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications