CoronaVirus: Take special care when handling notes; Action if the rules are not followed rkp
CoronaVirus : नोटा हाताळताना विशेष काळजी घ्या; नियमांचे पालन न केल्यास कारवाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 8:29 PM1 / 6मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंद असली तरीही जीवनावश्यक सेवा सुरु आहे. त्यामुळे बँक किंवा दुकानात नोटा हाताळताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश राज्याच्या अन्न व औषध प्रशासानाने दिले आहेत. 2 / 6त्यात महत्त्वाचे म्हणजे, बँक कर्मचाऱ्यांनी व दुकानदारांनी नोटा हाताळल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ हाताळण्यापूर्वी व अन्न पदार्थ हाताळल्यानंतर हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 3 / 6या सूचनांचे पालक न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करणाऱ्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 4 / 6त्यानुसार, दुकानांच्या बाहेर रांगेत उभे राहाणाऱ्या ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखावे. अन्नपदार्थ हाताळल्यानंतर त्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नये. दुकाने-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा. मास्कचा वापर अनिवार्य आहे, ग्राहकांसाठी हॅण्डसॅनिटायझरची व्यवस्था करा अशा सूचनांचा समावेश आहे.5 / 6याखेरीज, अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी. वैयक्तिक स्वच्छता राखा. लॉकडाऊनच्या काळात अन्न व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करावी. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करू नका. 6 / 6नाशवंत अन्नपदार्थ फ्रीजमध्ये योग्य तापमानात साठवावे. त्याचे सेवन चोवीस तासांच्या आत करण्याबाबत ग्राहकांना सूचना द्याव्यात. या कालावधीत फक्त परवानाधारक-नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. पक्की बिले घेऊन त्याची बिले जतन करून ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications